🕒 1 min read
मुंबई: पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त मिळाला आहे. तर गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मात्र मोठा धक्का बसला आहे. यावरच राजकारणात ५० वर्ष घालवूनही विरोधकांकडे कसलेही अनुभव नाहीत, असा खोचक टोला भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला आहे. तर येणाऱ्या महापालिका निवडणुकामुळेही सध्या राजकारण तापले आहे. आता यासर्व पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“उत्तर प्रदेश किंवा चार राज्यांच्या निवडणुकींचा मुंबई पालिकेशी (Mumbai Municipal Corporation) काही संबंध नाही. गेली ५० वर्षांपासून आम्ही मुंबई पालिका लढत आहोत. आणि आणि या महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा आहे, तो कायम राहील.”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
दरम्यान ‘अभी तो असली लढाई मुंबई में होगी’ आम्हाला मुंबईला कोणत्याही पक्षापासून मुक्त करायचे नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
