कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banarjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) हे कोलकाता येथील चित्तरंजन नॅशनल कॅन्सर इन्सिट्यूटच्या ऑनलाईन उद्घाटनासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्र आले होते. यावेळी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भर बैठकीत या हॉस्पिटलचे उद्घाटन आम्ही यापूर्वीच केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
या उद्घाटनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘आरोग्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मला दोनदा फोन केला होता. मला वाटले हा कोलकात्यातील कार्यक्रम आहे, पंतप्रधान मोदी स्वत: यामध्ये रस दाखवत आहेत. मी त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छिते की, या हॉस्पिटलचे उद्घाटन आम्ही यापूर्वीच केलं आहे. करोना काळात आम्हाला केंद्रांची गरज होती. तेव्हा आम्हाला समजले की चित्तरंजन रुग्णालय राज्य सरकारशी जोडलेले आहे. रुग्णांच्या सेवेसाठी अशा परिस्थितीत विलंब न लावता आम्ही त्याचे उद्घाटन करून त्याचे करोना सेंटर बनवले.’ असे ममता म्हणाल्या.
तसेच, ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, ‘राज्य सरकार कर्करोग रुग्णालयासाठी २५ टक्के बजेट देत आहे. या रुग्णालयासाठी राज्य सरकारने ११ एकर जागा दिली आहे. त्यामुळे जनतेचा विचार करता राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे काम केले पाहिजे.’ असे मतही ममता बॅनर्जी यांनी यावेळी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘जिवाची काळजी असेल तर…’ पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी साधला मोदींवर निशाणा
- “गोव्यातील निवडणुकीत पैशांचा पाऊस!”, राऊतांचा रोखठोकमधून गडकरींवर निशाणा
- पुढील चार दिवस महराठवाडा, विदर्भात गारपीटीसह पावसाचा इशारा
- वडिलांच्या निधनानंतर विशाल ददलानी भावूक, म्हणाला “त्यांना शेवटचे…”
- मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रीम कोर्टात विनोद पाटील मांडणार ‘हा’ महत्वाचा मुद्दा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

