🕒 1 min read
पाकिस्तान : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या ताब्यात अमेरिकेची बाजू घेतल्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली, असल्याचे वक्तव्य करत नाराजी व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या भूमिकेसंदर्भात अमेरिकेच्या खासदारांनी सतत टीका केल्यानंतर इम्रान खान यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘रशिया टुडेला’ दिलेल्या मुलाखतीमध्ये इम्रान खान यांनी अफगाणिस्तानात अमेरिकेच्या अपयशासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अमेरिकेच्या अपयशासाठी विनाकारण बोट दाखवले जात असल्याचेही इम्रान म्हणाले आहे.
काही दिवसांपूर्वीच सीनेटच्या परराष्ट्र संबंध समितीच्या सुनावणीत अमेरिकन खासदारांनी पाकिस्तानवर तालिबानला मदत केल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देत इम्रान म्हणाले की,’एक पाकिस्तानी म्हणून त्या सीनेटर्सनी केलेल्या टिप्पण्यांमुळे मला खूप दुःख झाले आहे. अफगाणिस्तानमधील या पराभवासाठी पाकिस्तानला दोष देणे ही आमच्यासाठी सर्वात वेदनादायी गोष्ट आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’जेव्हा अमेरिकेत ९/११ चा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा पाकिस्तानची स्थिती चांगली नव्हती. पाकिस्तानी सैन्याचे जनरल परवेझ मुशर्रफ लष्करी सत्तेवर आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या सरकारसाठी अमेरिकेची मदत मागितली होती. अफगाणिस्तानवरील हल्ल्यासाठी पाकिस्तानी पाठिंब्यामुळे अमेरिकेच्या लष्कराला मदत झाली. परंतु हा चुकीचा निर्णय होता’, असेही इम्रान म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण’?, भाजपचा सवाल
- मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधींकडून अंबिका सोनींना हिरवा कंदिल; मात्र आता सोनींचाच नकार
- ..म्हणून ‘माजी’ म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा
- ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या’, कॅप्टन अमरिंदर यांचा दावा
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
