Share

‘परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण’?, भाजपचा सवाल

Published On: 

सोलापूर : सामाजिक माध्यमांशी संवाद साधतांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्रांचा प्रहार करत तुटपुंजा पगार आणि तोही वेळेत होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यातच महामंडळाला आवश्यक नसलेल्या गोष्टींसाठी टेंडर काढली जात आहेत. हे कुणाच्या टक्केवारीसाठी चाललं आहे? असा सवाल करतानाच परिवहन मंत्र्यांच्या महामंडळाताली सचिन वाझे कोण?, असा सवाल केला आहे.

माध्यमांशी संवाद साधतांना पडळकर म्हणाले की,’मोठ्या विश्वासाने महाराष्ट्रातील प्रवासी एसटीने प्रवास करतो. परंतुआपल्या त्यागाने आणि सेवेने एसटी महामंडळला मोठे करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची ही वेळ यावी ही राग आणि अपमान वाटणारी गोष्ट आहे. एकतर तुटपुंजा पगार. त्याचाही वेळेवर पत्ता नाही. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करारअजून झाले नाहीत’ असे म्हणत पाडळकरांनी ठाकरे सरकारवर टोलेबाजी केली आहे. तसेच महामंडळाला आवश्यकता नसणाऱ्या गोष्टींसाठी हजारो कोटींचे टेंडर काढ़ून खाजगी कंत्राटदारांची संपूर्ण देणी दिली जाते. पण कर्मचाऱ्यांचे मूलभूत पगार दिले जात नाहीत. हे सर्व कुणाच्या टक्केवारीसाठी चाललंय? परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातला सचिन वाझे कोण?, असा प्रश्न करतानाच या सर्वांविरोधात ज्या युनियने आवाज उठवायला पाहिजे तेच आज प्रस्थापितांच्या तालावर नाचत आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील साक्री येथे एसटी महामंडळात कमलेश बेडसे काही दिवसांपासून मानसिक तणावातून जात होते. तसेच त्यांच्यावरील कर्ज वाढल्याने ते नैराश्यात गेले होते. शेवटी तुटपुंज्या पगारामुळे घरातील आर्थिक स्थिती खालावत गेल्यामुळे त्यांनी २७ ऑगस्ट रोजी त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!