पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका कार्यक्रमा दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना माजी मंत्री म्हणून संबोधिण्यात आले असता चंद्रकांत पाटील यांनी माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करु नका असे म्हटले होते. पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होते. तसेच या वक्तव्यामागे अनेक तर्क-वितर्क देखील लावण्यात येत होती. परंतु आता पाटील यांनी स्वतःच आपल्या वक्तव्या संदर्भात खुलासा केला आहे.
पुण्यात कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आज(१९ सप्टें.)चंद्रकांत पाटील यांनी समाज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असतांना आपण केलेल्या विधानाचा खुलासा करत ते म्हणाले की,’ प्रसंग असा आहे की, देहू इथल्या एका सलूनच्या उद्घाटनासाठी मी गेलो होतो, तिथे घोषणा सुरू होती की माजी मंत्री यांनी पुढे यावे. तर त्यावर मी म्हणालो की अरे माजी काय म्हणतो चार दिवसाने ते आजी होतील. त्यामुळे त्यात मला माजी मंत्री म्हणून नका असे काही मी म्हणालो नव्हतो. एवढ्या छोट्या गावातही कोणीतरी ही क्लीप तयार केली आणि ती फिरवली. आता सामाजिक जीवनामध्ये एकदा तुमच्या नावाने बील लागले की एकामागून एक घटना घडत असतात. आता इतकेच सांगतो की त्यानिमित्ताने महाराष्ट्रात राजकीय चर्चा झाली. माझा कुठलाही हेतू असा नव्हता की मला माजी मंत्री म्हणू नका, आगामी दोन तीन दिवसांत काही घटना घडेल. आता जे चाललंय ते चालूद्या.’ असेही पाटील म्हणाले.
दरम्यान, एका खासगी दुकानाच्या उद्घाटना करीता पाटील देहूगाव येथे गेले होते. उद्घाटनापूर्वी सूत्र संचालन करणाऱ्या व्यक्तीने माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन होत असल्याचे म्हटले. त्यानंतर पाटील माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल असे वक्तव्य केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’
- वेळ गेलेली नाही, अजूनही शिवसेना-भाजपची युती होऊ शकते; आठवलेंना विश्वास
- ‘पवारांवर जनताच नाराज; त्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार नाही’
- ‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही’
- बाप्पा चालले गावाला… श्रीमंत दगडूशेठ बाप्पाचे विसर्जन उद्या ‘या’ वेळी होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

