Share

‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या’, कॅप्टन अमरिंदर यांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

पंजाब : पंजाब राजकीय क्षेत्रात सध्या भूकंप आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका असल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असे म्हणत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी सामाजिक माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला फोन करुन सॉरी म्हणाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

माध्यमांशी बोलतांना सिंग म्हणाले की, ‘सोनिया गांधी यांनी मला सकाळी फोन केला परंतु मी तो उचलू शकलो नाही. त्यानंतर मी त्यांना पुन्हा फोन केला आणि हे सगळे काय चालले आहे. याबद्दल विचारणा केली आणि अशा परिस्थितीत मी राजीनामा देणे योग्य आहे, असेही त्यांना सांगितले. यावर त्या म्हणाल्या की ठीक आहे, द्या तुम्ही राजीनामा आणि त्यानंतर त्या सॉरी अमरिंदर’ असेही म्हणाल्या.

दरम्यान, सिंग यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर अनेक नवे मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत दाखल झाली आहेत. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय माजी खासदार आणि पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांचे नाव निश्चित झाले आहे. फक्त एवढेच नाही तर पंजाब सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री पदासाठी चरणजीत सिंग चन्नी, राजकुमार वेरका तसंच सुखजिंदर सिंग रंधावा यांची नावे समोर येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!