🕒 1 min read
चंदीगड : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गोंधी यांनी अखेर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास सोनी यांनी नकार दिल्याचे समजते. काँग्रेस हायकमांडचा निर्णय आल्यानंतर पंजाब काँग्रेसच्या आमदारांची होणारी बैठकही रद्द झाली आहे. सोनी यांनी आरोग्याचे कारण पुढे करत मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास नकार दिला आहे.
आंबिका सोनी राजी झाल्यास आज त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या चंदीगड येथिल एका समारंभात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आंबिका सोनी या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत शिवाय सोनिया गांधी यांच्या विश्वासू आणि जवळच्या समजल्या जातात.
काँग्रेसने इतर कुणाला मुख्यमंत्रीपद दिल्यास सिद्धू आणि अमरिंदर सिंग गटातील कुरापती सुरुच राहू शकतात. या गटबाजीमुळे पंजाबमध्ये अंतर्गत कलह अनेकदा समोर आला आहे. भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये यासाठीच काँग्रेस हायकमांडने हा निर्णय घेतल्याचे समजते. आंबिका सोनी यांना मुख्यमंत्री केल्यास अंतर्गत कलह समाप्त होऊन अगामी निवडणुकांसाठी त्याचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो. तसेच सोनी या हिंदू खत्री असल्यानेही त्यांच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी शिक्कमोर्तब केल्याचे सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’
- वेळ गेलेली नाही, अजूनही शिवसेना-भाजपची युती होऊ शकते; आठवलेंना विश्वास
- ‘पवारांवर जनताच नाराज; त्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार नाही’
- ‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही’
- बाप्पा चालले गावाला… श्रीमंत दगडूशेठ बाप्पाचे विसर्जन उद्या ‘या’ वेळी होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
