उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. या वाढत्या कहरमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे, उस्मानाबाद स्मशानभूमीही बुधवारी गहिवरली कारण कोरोनाने मृत्यू झालेल्या १९ रूग्णांच्या मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.उर्वरित आठ मृतदेह हे जागा नसल्याने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने कोरोनाचे सगळे नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला असून बेड, रेमडीसीवीर इंजेक्शन, ऑक्सिजन साठा संपत आला आहे, कोरोनाने आजवर ६४३ मृत्यू झाला आहे तर ४ हजार ९४० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 307 रुग्ण सापडले तर तुळजापूर ४०, उमरगा तालुक्यात 74 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतो आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या ४ हजार ९४० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत त्यामुळे रुग्णालयात रुग्णाची गर्दी झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारपर्यंत १ लाख ७७ हजार ६१३ नमुने तपासले त्यापैकी २६ हजार ४६७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात २० हजार ८८४ रुग्ण बरे झाले असून ७९.९९ टक्के हा रिकव्हरी रेट आहे. तर ६४३ रुग्णांचा मृत्यू झाला असून २.४४ टक्के मृत्यू दर आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तातडीने रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे असे आवाहन सतत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- विवोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनला कोहली
- विराट कोहली पुन्हा भडकला; रागाच्या भरात कोहलीने केले असे काही
- राजस्थानविरुद्ध दिल्ली ; सॅमसन-पंत आमने-सामने
- दिल्ली कॅपिटल्स संघाची चिंता वाढली, सामन्यापूर्वी धडाकेबाज खेळाडूला कोरोनाची लागण
- सामन्याला कलाटणी देणारे षटक; एक धाव देत ३ गडी बाद; शाहबाज अहमदची कमाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

