🕒 1 min read
चेन्नई : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विराट कोहलीच्या बेंगलुरु रॉयल चॅलेंजर्स संघाने हैदराबाद सनरायझर्स संघाचा ६ धावांनी पराभव केला आहे. स्पर्धेतील आरसीबीचा हा सलग दुसरा विजय आहे तर हैदराबादच्या संघाचा सलग दुसरा पराभव आहे. धडाकेबाज अर्धशतक करणाऱ्या आरसीबी संघाच्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
बुधवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने आपला सलग दुसरा सामना गमावला आहे. मात्र असे असले तरीही हैदराबादचा कर्णधार डेव्हीड वॉर्नरने या सामन्यात अर्धशतक करत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. वॉर्नरने ३७ चेंडुत ७ चौकार आणि १ षटकारासह ५४ धावांची खेळी केली. यासह डेव्हीड वॉर्नर हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
डेव्हीड वॉर्नरने आयपीएलमध्ये १४४ सामन्यांत ४२.४८ च्या सरासरीने ५३११ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये रोहितच्या नावावर २०२ आयपीएल सामन्यात ५२९२ धावा आहेत, तर धवनच्या नावावर १७६ डावांमध्ये ५२८२ धावा आहेत. त्यामुळे आता रोहित शर्मा सर्वाधिक आयपीएल धावा करणाऱ्यांमध्ये चौथ्या आणि धवन पाचव्या क्रमांंकावर आहे. या यादीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली ५९४४ धावांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. सिएसकेकडून खेळणारा सुरेश रैना ५४२२ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या
- विवोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनला कोहली
- विराट कोहली पुन्हा भडकला; रागाच्या भरात कोहलीने केले असे काही
- राजस्थानविरुद्ध दिल्ली ; सॅमसन-पंत आमने-सामने
- दिल्ली कॅपिटल्स संघाची चिंता वाढली, सामन्यापूर्वी धडाकेबाज खेळाडूला कोरोनाची लागण
- सामन्याला कलाटणी देणारे षटक; एक धाव देत ३ गडी बाद; शाहबाज अहमदची कमाल


