🕒 1 min read
चेन्नई : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विराट कोहलीच्या बेंगलुरु रॉयल चॅलेंजर्स संघाने हैदराबाद सनरायझर्स संघाचा ६ धावांनी पराभव केला आहे. स्पर्धेतील आरसीबीचा हा सलग दुसरा विजय आहे तर हैदराबादच्या संघाचा सलग दुसरा पराभव आहे. धडाकेबाज अर्धशतक करणाऱ्या आरसीबी संघाच्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात आरसीबीचा कर्णधार कोहलीने सलामीला फलंदाजी करत २९ चेंडुत चार चौकाराच्या मदतीने ३३ धावा केल्या. जेसन होल्डर टाकत असलेल्या बाराव्या षटकात कोहली बाद झाला. बाद झाल्यानंतर विराटने सीमेरेषेवर आपली बॅट आपटली. त्यानंतर डगआऊटमध्ये एका रिकाम्या खुर्चीवर आपला राग काढला. कोहलीने आपल्या हातातील बॅट त्या खुर्चीवर आपटली आणि ती फोडण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला आहे.
https://twitter.com/KhudroM/status/1382472524492013570
या सामन्यापुर्वी कोहली मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्यातही ३३ धावाच करता आल्या होत्या. मात्र सलग दुसऱ्या यावेळी मैदानातून पॅव्हेलियनमध्ये जात असताना कोहलीने आपला राग मैदानात काढल्याचे पाहायला मिळाले. विराटवर आता कारवाई होणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असेल. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत विराट हा सलामीला खेळणार आहे त्याने स्पर्धेपुर्वीच स्पष्ट केले होते.
महत्वाच्या बातम्या
- राजस्थानविरुद्ध दिल्ली ; सॅमसन-पंत आमने-सामने
- दिल्ली कॅपिटल्स संघाची चिंता वाढली, सामन्यापूर्वी धडाकेबाज खेळाडूला कोरोनाची लागण
- सामन्याला कलाटणी देणारे षटक; एक धाव देत ३ गडी बाद; शाहबाज अहमदची कमाल
- अटीतटीच्या सामन्यात आरसीबीची हैदराबादवर ६ धावांनी मात; आरसीबीचा सलग दुसरा विजय
- कोराेना रुग्णांचा विक्रम , परभणीत १ हजार १७२ व्यक्ती कोरोनाबाधित, २० बाधितांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

