Share

‘महाविकास’ आघाडी सरकार म्हणजे तीन बायकांचा संसार; ओवेसींचा घणाघात!

Published On: 

औरंगाबाद :राजकारणात काहीही अशक्य नसते कधीही काहीही होऊ शकते. जर त्यांची तयारी असेल तर आम्ही नक्की आघाडी करु, असे म्हणत येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. तसेच काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लग्न करतात. हा तर तीन बायकांचा संसार असल्याचे म्हणत  हे कुठलं सेक्युलॅरिझम आहे? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी २ दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कशाप्रकारे महाविकास आघाडीवर टीका केली.

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार आहे. तिरंगा झेंडा हातात घेऊन एमआयएम दुचाकी रॅली काढणार असल्याचे ओवेसी यांनी जाहीर केले आहे. यावेळी खा. इम्तियाज जलील यांनी ही घोषणा केली. औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यात आता एमआयएमही मागे नाही. ओवेसी यांच्या उपस्थितीत मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा एक प्रकारे शुभारंभच करण्यात आला.

मुस्लिम समाज आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहे. उच्च न्यायालयानेही मुस्लिमांचे आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण मान्य केले आहे. दलितांनंतर मुस्लिम मागास आहेत. या पार्श्वभूमीवर मुस्लिमांना आरक्षण मिळायलाच हवी अशी भूमिका जलील यांनी घेतली. मुस्लिम आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण तिरंगा रॅलीत सहभागी होणार असल्याचे, जलील यांनी सांगितले. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ही रॅली काढली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!