🕒 1 min read
पुणे – केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना इंधन दरवाढीचा मुद्दा हा भाजपने चांगलाच लावून धरला होता. वेगवेगळ्या जाहिराती,पोस्टर,आंदोलने करत कॉंग्रेसला भाजपने पाळता भुई थोडी केली होती. इंधन दरवाढ केल्याने होणाऱ्या जनतेच्या हाल त्यावेळी भाजप नेत्यांना दिसत होते मात्र आता इंधनाचे दर गगनाला भिडले असताना भाजपनेते निर्लज्जपणे या मुद्द्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
देशात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नुकतेच भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. सुब्रमण्यम स्वामींनी इंधन दरवाढीवरून टीका करताना थेट प्रभू राम, सीता आणि रावणाचा उल्लेख करून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तर दुसऱ्या बाजूला दैनिक सकाळने दिलेल्या वृतानुसार,भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात केंद्रातील योजनांसाठी पैसा कोठून आणायचा, असा प्रश्न मांडत पेट्रोल, डिझेलवर सेस लावून इंधन दरवाढीच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. मग याच प्रश्नाचे उत्तर कॉंग्रेसचे सरकार असताना तत्कालीन नेत्यांनी असेच दिले असते तर दादांनी मोठा हंगामा केला असता.
झोपी गेलेला विरोधी पक्ष
दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांची किंमत कमी असतानाही भारतात मात्र, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. रोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे. वारंवार कोणते तरी कर लावून इंधन दरवाढ होत असल्याचे चित्र आहे.जनतेचा अत्यंत जिव्हाळ्याचा हा मुद्दा असताना विरोधी पक्ष मात्र झोपी गेला आहे कि काय हा सवाल उपस्थित व्हावा अशी स्थिती आहे. भाजपला खिंडीत पकडण्याची नामी संधी चालून आलेली असताना नुरा कुस्ती खेळल्याप्रमाणे विरोधक छोटी मोठी आंदोलने करून भाजपला मनमानी आणि निरंकुश कारभार करू देत आहे.
इंधन दरवाढ का होतेय? यावर उपाय काय ? सरकारच्या धोरणातील नेमक्या त्रुटी काय आहेत यावर नेमकेपणाने बोलू शकतील असे हाताच्या बोटावर मोजण्या एवढे नेते आहेत.जी काही छोटी मोठी आंदोलन होत आहेत त्यात आंदोलन कमी आणि फोटोसेशन जास्त होताना दिसून येत आहे.
सर्वसामान्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य नसलेले नेते चमकोगिरी करण्यासाठी आंदोलने घडवून आणत आहेत.या मुद्द्याचा सोशल मिडीयावर निषेध नोंदविला कि आपले काम झाले अश्या अविर्भावात काही नेते फिरत असतात. राज्यात भाजप विरोधी महाविकास आघाडीचे सरकार आहे पण किती नेत्यांना या मुद्द्याचे सोयरसुतक आहे याबद्दल देखील शंका उपस्थित होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- ‘लोकशाहीविरोधी व्यवहारामुळे झालेले नुकसान क्रिकेटपटूंनी केलेल्या ट्विट्समुळे भरून निघणार नाही’
- मोठी बातमी : काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली
- ग्रेटा थनबर्गने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये होते तरी काय ?
- मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौरा; नव्या घोषणा होण्याची शक्यता
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
