Share

‘…हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र’; राणेंच्या अटकेनंतर फडणवीसांची खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. नाशिक पाठोपाठ पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील पोलिसांचे पथक रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी त्यांना संगमेश्वरमध्ये येथून ताब्यात घेतलं आहे.

नारायण राणे यांना आता संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून कार्यकर्त्यांनी बाहेरील परिसरात मोठी गर्दी केली आहे. दरम्यान,  ‘केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे.पोलिस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो. शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक! हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र !!!’ असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

नारायण राणे यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचं भाष्य –

‘त्यांचे ब्लड, शुगर बघता आलेले नाही. त्यांचे ब्लड प्रेशर तपासलं असून ते अधिक आहे. ते डायबेटिक रुग्ण आहेत. ईसीजी करावी लागेल आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, असं निरीक्षण नोंदवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जेव्हा त्यांचे रक्तदाब तपासले तेव्हा १६०/११० होतं,’ असं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!