पुणे : वनविभाग आणि अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. वनविभागाने तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर रानगव्याला पकडले, मात्र काही वेळातच या प्राण्यानं आपला जीव सोडला. त्यानंतर रानटी गव्याला पकडण्याची मोहिम हाती घेण्यात आली. या घटनेबद्दल सोशल मीडियावर उत्सुफुर्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आपण फार हिंस्त्र होत चाललो आहोत, असं म्हणत गिरीश कुलकर्णींनी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.
एखादा माणूस रस्ता चुकून गावात आला, लहान मूल घर चुकून आजूबाजूला गेलं, तर आपण लगेच शोधाशोध करून त्याला रस्ता दाखवतो. त्याला त्याच्या घरी सोडतो. चुकलेला प्राणी जर आपल्याकडे आला तर त्याला कशी वागणूक द्यावी, याबाबत माणसाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. माणसाने संवेदनशील बनवण्याची गरज निर्माण झाली असल्याचं गरीश कुलकर्णीं यांनी सांगितलं. बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
आपण फार हिंस्त्र होत चाललो आहोत. आमच्या कुतूहलापोटी, आमच्या उत्सुकतेपोटी, आमच्या हव्यासापोटी आपण हिंस्त्र होत आहोत. लोकांनी गर्दी केली आणि त्याला पळवलं. अशा स्थितीत रागनवा मेला याचं नवल नाही. उलट तो मेला म्हणून सुटला असं म्हणावं लागेल. नाहीतर आपण कसंही त्याला मारलाच असता, असं कुलकर्णींनी म्हटलं आहे.
दरम्यान, गवाच काय माणूसही सध्या घाबरलेला आहे. भयावह वर्तमान आहे. शहर माणसाला भीती घालतं. दडपून टाकतं. माणसाची ही कहानी आहे. मग या परिस्थितीत मुक्या जंगली प्राण्याचा काय चालेल?, असा सवालही कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : मुख्यमंत्री ठाकरेंपासून अनेक मंत्र्यांच्या संपर्कात आलेले डिसले गुरुजी कोरोनाच्या विळख्यात!
- मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम; आता एमपीएससी परीक्षा, मेगा भरतीचं काय?
- महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा युवकांसमोर अंधार; चंद्रकांत पाटलांचा घणाघात
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- मुख्यमंत्री आज पुणे-रत्नागिरी-सातारा दौऱ्यावर


