Share

मुख्यमंत्री आज पुणे-रत्नागिरी-सातारा दौऱ्यावर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी) सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्य़ांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी करणार आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे गुरुवारी सकाळी जुहू विमानतळावरून हेलिकॉप्टरने कोयनानगरकडे (ता. पाटण, जि. सातारा) प्रयाण करतील. तेथून मोटारीने रत्नागिरी जिल्ह्य़ातील पोफळी जलविद्युत प्रकल्पास्थळी जाऊन कोयना टप्पा ४ विद्युतप्रकल्पाची पाहणी करतील.

दुपारी ते कोयना धरण विश्रामगृहावर येतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने ओझर्डे (ता. मावळ, जि. पुणे) येथे जाऊन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची पाहणी करतील.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!