Share

मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम; आता एमपीएससी परीक्षा, मेगा भरतीचं काय?

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आज महत्त्वाचा दिवस होता. कारण, आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी झाली. यातून मराठा समाजातील नागरिकांना दिलासा मिळणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालाच्या घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे.

घटनापीठासमोर आजच हे प्रकरण आलं आहे. त्यावर विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. त्यामुळे यावर युक्तिवाद झाल्यावरच निर्णय घेण्यात येईल, असं सांगत घटनापीठाने ही स्थगिती उठवण्यास नकार दिला. २५ जानेवारीला यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान, राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून याआधीच राज्यव्यापी आंदोलने करण्यात आली होती. आता, स्थगिती उठवण्यास या खंडपीठाने तात्पुरता नकार दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

तर, मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता. यानंतर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली गेली. यासोबत राज्य सरकारने घोषित केलेली तथाकथित मेगा भरती देखील अद्याप प्रतीक्षेतच ठेवण्यात आली. याविषयी राज्य सरकारने कोणतंही पाऊल उचललेलं नाही.

आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आले आणि एमपीएससी परीक्षा परीक्षेच्या दोन दिवस आधीच पुढे ढकलली गेली. सरकारने परीक्षा पुढे ढकलत मराठा विद्यार्थ्यांना दिलासा दिला मात्र आता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी करायचं काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

मंत्री छगन भुजबळ व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील या परीक्षा पुढे ढकलण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडं, ओबीसी समाज देखील आरक्षण अबाधित राहावं, मेगा भरतीसह स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेतल्या जाव्यात यासाठी रस्त्यावर उतरलेला दिसला. आता, खंडपीठाने स्थगिती उठवण्यास नकार दिल्याने पुन्हा एकदा मराठा विद्यार्थ्यांसह सर्वच समाजातील विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. त्यामुळे, राज्य सरकार यावर दुसरा काही तोडगा काढणार का? याकडे विद्यार्थी आस लावून बसले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!