Share

जोपर्यंत संपूर्णतः लसीकरण होत नाही तोपर्यंत आपण डेंजर झोनमध्येच, काळजी घेण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन!

Published On: 

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे संसर्गाची स्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र तरीही शहर अजूनही डेंजर झोनमध्येच आहे. शहरातील ७० टक्के नागरिकांचे लसीकरण होत नाही तसेच जोपर्यंत त्यांच्यात अँटिबॉडीज निर्माण होत नाहीत, तोवर शहर सुरक्षिततेच्या परिघात येणार नाही, असे मत महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी (दि.२४) व्यक्त केले.

पालिका आयुक्‍त पांडेय यांनी सोमवारी पत्रकारांशी कोरोनाच्या परिस्थितीबाबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मागील आठवडाभरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी व करोनामुळे मृत्यमुखी पडलेल्यांची आकडेवारी माध्यमांसमोर सादर केली. लॉकडाऊन, लसीकरण आणि स्वयंशिस्त या तीन घटकांमुळे शहराची स्थिती कोरोनाबाधितांच्या बाबतीत नियंत्रणात आहे, असे वाटत असले तरी मृतांची संख्या लक्षात घेता शहर अद्यापही डेंजर झोनमध्येच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, औरंगाबाद शहराची लोकसंख्या अंदाजे सतरा लाख आहे.

या लोकसंख्येच्या सत्तर टक्के नागरिकांचे लसीकरण झाले, त्यांच्यात अँटिबॉडीज निर्माण झाल्या तरच आपले शहर सुरक्षिततेच्या परिघात येऊ शकेल. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी औरंगाबाद शहरात सिरो सर्वेक्षण केले. त्यात १७ टक्के लोकांमध्येच अँटिबॉडीज आढळून आल्या, सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान ज्यांना कोरोनाची लागण झाली त्या व्यक्तींमध्ये देखील आता अँटिबॉडिज निर्माण झालेल्या आहेत, हे प्रमाण सुमारे वीस टक्के आहे. शहरात तीन लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे, हे प्रमाण देखील वीस टक्के आहे.

जानेवारी ते मार्च दरम्यान दहा टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे त्यांच्यात अँडिबॉडिज् निर्माण झाल्या आहेत. अँटिबॉडिज् शरीरात जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत राहू शकतात. त्यामुळे सिरो सर्वेक्षणात ज्या सतरा टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडिज् आढळून आल्या, त्यांचा सहा महिन्याचा कालावधी आता संपत आहे. त्यामुळे अशा व्यक्‍तींचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!