Share

सोलापुर शहरात भर पावसाळ्यात पाणी टंचाई

Published On: 

सोलापूर : महापालिकेच्या नवख्या भाजपच्या कारभारींच्या कामकाजाचा फटका सोलापूरकरांना बसत आहे. नियोजन चुकल्याने भर पावसाळ्यात सोलापूरकरांना उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची स्थिती अनुभवावी लागत आहे. शहरास पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा असून, टाकळी जॅकवेलला ११ इंच इतके पाणी आहे. शहरात तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. उजनी धरणातून गुरुवारी सात हजार ५०० क्युसेकने सोडण्यात आले. धरणापासून पाणी ९२ किमी पुढे आले आहे. आणखी १४० किमी अंतर कापायचे आहे.

वेळीच पाठपुरावा नाही

शहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वेळीच पाठपुरावा केला नाही. सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासोबत जाऊन निवेदन दिल्याने पाणी सोडले. हे प्रयत्न दोन दिवस अगोदर झाले असते तर पाच दिवसाआडची पाळी आली नसती.

“नियोजन शून्य कारभारपावसाळ्यातशहरातपाच दिवसाआड पाणीपुरवठा म्हणजे महापालिकेचे नियोजन शून्य कामकाज आहे. पाण्यासाठी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पाठपुरावा करुन उजनीतून अगोदर पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. गटाच्या राजकारणात गुंतल्या.” चेतन नरोटे, काँग्रेस गटनेता

“नागरिकांचा उद्रेकपुन्हा दिसून येईल. पाण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. याबाबत आम्ही वेळीच निवेदन दिले होते. पण त्यांची दखल घेतली नाही. ती घेतली असती तर आज ही वेळ आली नसती.” आनंद चंदनशिवे, बसपा गटनेता

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!