Share

जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिल्लोड दौऱ्यावर, राज्यमंत्री सत्तारांसोबत झाली विशेष ‘चर्चा’!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिल्लोड- कन्नड दौऱ्यावर असतांना त्यांनी शनिवारी सिल्लोड नगर परिषदेस सदिच्छा भेट दिली. यावेळी नगर परिषदेच्या वतीने  जयंत पाटील यांचा सन्मानचिन्ह, शाल , पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विविध विकास कामांबाबत जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पा. चिकटगावकर, राष्ट्रवादी आरोग्य सेलचे डॉ. काळे आदी उपस्थित होते.

यावेळी नगर परिषदेच्या वतीने युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती अर्जुन पा. गाढे यांनी तर व्यापारी महासंघाच्या वतीने नॅशनल सुत गिरणीचे उपाध्यक्ष नरेंद्र ( बापू ) पाटील यांनी ना. जयंत पाटील यांचा सत्कार केला. नगर परिषद कार्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नगर परिषदेच्या विकास कामा सोबत मतदार संघाच्या भौगोलिक क्षेत्राची माहिती मंत्री पाटील यांना दिली. यावेळी मतदार संघातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात देखील चर्चा करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख दुर्गाबाई पवार,डॉ. संजय जामकर, आदींसह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!