🕒 1 min read
औरंगाबाद : शहराच्या स्वच्छतेचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत असून येणाऱ्या काळात औरंगाबाद शहर हे टॉप फाईव्ह मध्ये आणल्यास तुम्ही माझ्याकडून तुमच्यासाठी मोठ्या घोषणेची अपेक्षा नक्कीच करू शकता, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी रविवारी (दि.२६) केले.
आजादी का अमृत महोत्सव या अभियानातर्गत महानगरपालिकेच्या १२५ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला. या सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले, शहरातील पडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाले असून लवकरच हर्सुल कचरा प्रक्रिया केंद्र देखील लवकर कार्यान्वित होणार आहे.
यामुळे मागील काळात घनकचरा व्यवस्थापनाचा झालेला प्रश्न मार्गी लागला आहे .मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शहर जास्त स्वच्छ दिसत आहे. अशा प्रतिक्रिया बाहेरून आलेल्या लोकांकडून मला मिळत आहेत. याचा मला अभिमान आहे. या पुढच्या काळात कचरा पासून उत्पन्न निर्मिती होणार आहे. घनकचऱ्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी त्यांच्याशी घनकचरा व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी संवाद साधून त्यांना या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावे, घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांची देखील जबाबदारी आहे. याची जाणीव ही नागरिकांनी ठेवावी.
महत्त्वाच्या बातम्या
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे
- औरंगाबादेतील प्रसिद्ध जातिवाचक वसाहतींची नावे बदलणार; राज्य सरकारचा निर्णय!
- …म्हणून धोनीने मानलेल्या भावाला म्हणजेच ब्राव्होला संघाबाहेर ठेवलं
- पंचनाम्याचे ढोंग नको, सरसकट मदत जाहीर करा- संभाजी पाटील निलंगेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
