मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद रंगल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. आता पीएमसी बँक घोटाळ्यावरून चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. या आरोपाला संजय राऊत यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं होतं.
‘चंद्रकांत पाटील यांनी पीएमसी घोटाळ्याबाबत केलेले आरोप मला मान्य नाही. आम्ही असले फालतू धंदे करत नाही मी पाटलांवर सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहे, कारण पाटील यांची लायकी सव्वा रुपयाचीच आहे’ अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली होती. संजय राऊत यांच्या या टीकेचा भाजप नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला होता.
आता संजय राऊत यांनी पुण्यात शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा या वादावर भाष्य केलं असून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील केस जिंकणार असल्याचा दावा देखील केला आहे. ते म्हणाले, ‘चंद्रकांत दादा म्हणाले माजी म्हणून नका. मी नाही म्हणणार. कारण आमची मैत्री आहे. त्या मैत्री मुळेच मी सव्वा रुपयांचा दावा लावला आहे. चंद्रकांत दादा म्हणतात तुमची किंमत एवढी कमी कशी? खरंतर ही माझी किंमत नाही. ती तुमची किंमत आहे.’
यासोबतच, ‘मला नकोय तुमचे शंभर कोटी. सव्वा रुपया पुरेसा आहे. एक सांगतो, चंद्रकांतदादांना सव्वा रुपया द्यावाच लागणार आहे. मीही सव्वा रुपया घेतल्याशिवाय राहणार नाही. मी कोणतीही केस हारत नाही. हरलो नाही. दोन वर्षापूर्वीच एक केस जिंकली. मुख्यमंत्री आमचा झाला,’ असा टोला देखील राऊत यांनी पाटील यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून धोनीने मानलेल्या भावाला म्हणजेच ब्राव्होला संघाबाहेर ठेवलं
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे


