🕒 1 min read
मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मंडळावरील नियुक्त्यांसंदर्भात आक्रमक चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास मंडळावरील नियुक्त्या केल्या जाव्यात अशी मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीची १२ नाव जाहीर होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ जाहीर होतील, असं म्हटलं. त्यावरुन विधानसभेत वातावरण चांगलंच पेटलं.
अजित पवारांच्या विधानावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील चांगलीच टीका केलेली होती. ‘१२ आमदारांसाठी विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवत आहात’, असा आरोप त्यांनी केला होता.
गील काही काळापासून राज्यपालनाकडून केल्या जाणाऱ्या १२ आमदारांच्या नियुक्त्या होत नसल्याने मराठवाड्याचा विकासच काय संबंध असा सवाल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे विधान दुर्दैवी आहे. असा हल्लाबोल माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला.
यामुळे आता अजित पवार यांनी ट्वीट करून पुन्हा त्यांची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले कि, ‘विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे राज्य सरकारचे ध्येय आहे. त्यासाठी विधान परिषदेसाठी राज्य सरकारनं शिफारस केलेल्या सदस्यांच्या नियुक्त्याही तातडीनं होणं आवश्यक आहे.
विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वंकष विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरील नियुक्त्या लवकरच करण्यात येतील. विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. वैधानिक विकास महामंडळं अस्तित्वात असल्याचं गृहित धरुन निधीवाटपाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्याला संपूर्ण निधी दिला जाईल.’ असे ट्वीट त्यांनी केले आहेत.
विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे राज्य सरकारचे ध्येय आहे. त्यासाठी विधान परिषदेसाठी राज्य सरकारनं शिफारस केलेल्या सदस्यांच्या नियुक्त्याही तातडीनं होणं आवश्यक आहे. #विधिमंडळअर्थसंकल्पीयअधिवेशन२०२१
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 1, 2021
विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वंकष विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरील नियुक्त्या लवकरच करण्यात येतील. #विधिमंडळअर्थसंकल्पीयअधिवेशन२०२१
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 1, 2021
विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. वैधानिक विकास महामंडळं अस्तित्वात असल्याचं गृहित धरुन निधीवाटपाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्याला संपूर्ण निधी दिला जाईल.#विधिमंडळअर्थसंकल्पीयअधिवेशन२०२१
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 1, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कर्जमुक्तीसाठी ‘ही’ आहे अट
- भाजपला कडवं आव्हान देण्यासाठी काँग्रेस हायकमांडने पृथ्वीराज चव्हाणांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी !
- मनसेने ठोकले शाळेला टाळे
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
- मोदींनी घेतलेली लस ही प्रसिद्धीसाठी तर पवारांनी घेतलेली लस ही आरोग्यासाठी – मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

