🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. सारे सुरळीत असल्याचे सारखे वागु नका, नाही तर लॉकडाऊन करावे लागेल. तुमचेच नुकसान होणार असल्याचा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी सोमवारी औरंगाबादेत दिला आहे. औरंगाबाद शहरासह ग्रामीम भागातील नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले.
उद्योजक, व्यापारी, रिक्षा युनीयन, पेट्रोल पंप असोशिएशन, कृषी उत्पन्न बाजार समिती, हॉटेल व्यावसाईक आणि प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विविध संघटनेच्या घेतलेल्या बैठकीत मार्गदर्शन केले. आणि सर्वांनी गांर्भीयाने कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन या वेळी केले. अन्यथा मला कठोर कारवाइ करण्यास भाग पाडू नका, असा सल्ला देखील दिला आहे.
सर्व दुकानदारांनी दर अर्धा तासाने सॅनिटायझरचा वापर कॉउंटरवर करावा, कामगारांची आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी. नियम पाळले नाहीतर मला दुकाने सील करावी लागतील असा दम देखील भरला. रिक्षामध्ये दोन प्रवाश्यांच्यावर प्रवासी भरु नये, पेट्रोल पंप चालकांनी विना मास्क असणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल देवू नये, छोट्या – मोठ्या हॉटेल चालकांना गुन्हे दाखल करण्याचे तंबी देखील दिली आहे. आता या वर कितपत अंमलबजावणी होते ते पाहणे महत्वाचे असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- अर्ध्यावरती डाव मोडला.. कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
- मोबाइल टॉवरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक
- ‘१२ आमदारांसाठी विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवले’
- बीडच्या सात माजी आमदारांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

