🕒 1 min read
परभणी : इंदापूर येथून चोरीस गेलेले 29 फ्रीज परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी येथील वसमत रस्त्यावरील भालेराव संकुलामधून जप्त केले आहे. या प्रकाराने परभणी शहरामध्ये जप्त केलेल्या फ्रीजच्या साठ्याबद्दल दिवसभर चर्चा होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना भालेराव संकुलामध्ये काही संशयास्पद वस्तु लपून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना सकाळी मिळाली होती. त्यानुसार आलेवार, गुलाब बाचेवाड, नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांच्यासह कर्मचारी बालासाहेब तुपसुंदरे, शेख मोबीन, हरिचंद्र खूपसे, सानप, शेख अझर, मुरकुटे, निळे, राठोड, जाधव आदी घटनास्थळी पोचले. त्यावेळी भालेराव संकुलचे मालक भालेराव यांच्याकडे चौकशी केली असता भेंडेकर नावाच्या माणसाला ही रूम किरायाने दिली असल्याचे कळाले. या नुसार पोलिस पथकाने भेट दिली. या वेळी तट यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेंडेकर यांच्या वडीलासमोर या रूमची पाहणी केली.
त्यावेळी त्यात एका नामांकीत कंपनीचे 29 फ्रीज आढळले. याबाबत परिसरातील कोणीच काही माहिती सांगू शकले नाही. या पथकाने याबाबत रांजणगाव पुणे येथील कंपनीशी संपर्क केला असता त्यांनी हा रजिस्ट्रेशन असलेला माल इंदापूर येथील चोरीस गेलेला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत इंदापूर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद असल्याचेही म्हटले. दरम्यान, येथील सर्व फ्रीज जप्त केले. तर नवामोंढा पोलिस अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अर्ध्यावरती डाव मोडला.. कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
- मोबाइल टॉवरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक
- ‘१२ आमदारांसाठी विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवले’
- बीडच्या सात माजी आमदारांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

