Share

दहावर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर ब्रम्हगव्हाणचे पाणी खेर्डा प्रकल्पाकडे

Published On: 

पैठण : दहावर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर ब्रम्हगव्हाण सिंचन योजनाचे पाणी खेर्डा प्रकल्पाकडे सोडण्यात आले आहे. तीन पैकी एक पंप सुरू करण्यात आला. यावेळी गणपत माने या शेतकरी बांधवांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून पाणी खेर्डा प्रकल्पाच्या दिशेने सोडण्यात आले. याप्रसंगी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आदी उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षापासून रखडलेल्या ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या पाण्याची टेस्टिंग एक महिन्यापूर्वी करण्यात आली होती. ब्रम्ह गव्हाण उपसा सिंचन योजनाचा पहिला टप्पा मार्गी लागत असुन तालुक्यातील ५५ गावाची शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात येणार असल्याचे संदीपान भुमरे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २२२ कोटी रु च्या या योजनाला मंजुरी दिली आहे. पैठण तालुक्यातील ५५ गावाच्या पाणी प्रश्ना सह तालुक्यातील १४ हजार ५८२ हेक्टर शेतीला फायदा होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!