मुंबई : इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यात इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज झटपट बाद झाल्याने सुंदरला पहिल्या कसोटीत शतकापासून वंचित रहावे लागले. वॉशिंग्टन सुंदरच्या हुकलेल्या शतकानं सर्वांना वाईट वाटलं… ९६ धावांवर खेळत असताना समोर तीन फलंदाज होते, परंतु एकामागून एक तिघेही माघारी परतले अन् नॉन स्ट्राईकर एंडला सुंदर खाली बसला व नशीबानं मांडलेल्या थट्टेचा विचार करत होता. पण, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित प्रत्येकजण टाळ्यांचा कडकडाट करून सुंदरचे कौतुक करत होता.
“मी टीम इंडियाच्या शेपटीच्या फलंदाजांनी केलेल्या कामगरीबाबत फार नाराज आहे. हे फलंदाज अवघ्या मिनिटभरही मैदानात टिकू शकले नाहीत. समजा टीम इंडियाला विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असेल, तेव्हा हे फलंदाज असेच बाद झाले, तर ही मोठी चूक नसेल का”, असा संतप्त सवाल भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचे वडील एम सुंदर यांनी उपस्थित केला आहे. इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज झटपट बाद झाल्याने सुंदरला पहिल्या वहिल्या कसोटी शतकापासून वंचित रहावे लागले. या दोघांमुळे आपल्या मुलाचं शतक अधुर राहिल्याचं संताप सुंदरच्या वडिलांना अनावर झाला. त्यांनी इशांत आणि सिराजला खरीखोटी सुनावली.
“इंग्लंड विरुद्धची चौथी कसोटी देशातील लाखो तरुणांनी पाहिली असेल. या तरुणांनी इशांत आणि सिराजच्या खेळीतून काय बोध घेतला असेल, असा प्रश्न सुंदरच्या वडिलांनी उपस्थित केला. तसेच या दोघांनी जी चुकी केली, ती चूक भावी क्रिकेटपटूंनी करु नये”, असा सल्लाही त्यांनी यावेळेस दिला. सुंदरचे वडिल एका वृत्त संस्थेशी संवाद साधत होते. त्यावेळस त्यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली.
“इशांत आणि सिराज या दोघांनी मैदानात उभं राहण्याचं साहस दाखवलं नाही. या दोघांनी सहज विकेट गमावली. मैदानात तग धरणं फार मोठी गोष्टी नाही. त्यासाठी तुमच्याकडे धैर्य हवं. इंग्लंडचे गोलंदाज शारिरकदृष्ट्या थकले होते. बेन स्टोक्स 123-126 च्या वेगाने गोलंदाजी करत होता. तो फार आक्रमकपणे बोलिंग टाकत नव्हता”, असंही एम सुंदर यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या :
- औरंगाबादेत कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण, ५ रुग्णांचा मृत्यू, ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’
- तर औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांवर गुन्हा दाखल करू-जिल्हाधिकारी
- बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचा आधार घेत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


