Share

औरंगाबादेत कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण, ५ रुग्णांचा मृत्यू, ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या ४२६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एका ३६ वर्षीय तरुणासह ५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील तिघांचा तर जालना व परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. रविवारी आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३४८ रुग्ण मनपा हद्दीतील आहेत, तर ७८ रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून रोज रुग्णसंख्या ४०० वर जात आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ५२ हजार ९६९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ हजार २९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार २१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रविवारी १६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे औरंगाबामधील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४८ हजार ४५९ झाली आहे. तर रविवारी माया नगरातील ६६ वर्षीय पुरूष, परभणी जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिला व जालना जिल्ह्यातील ८५ वर्षीय महिलेचा घाटीत मृत्यू झाला. तर एन सहा सिडकोतील ३६ वर्षीय पुरुष व केळीबाजारातील ८२ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

औरंगाबादेत ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन
औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादमध्ये येत्या ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ४ एप्रिलपर्यंत राहिल. त्याचबरोबर शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!