औरंगाबाद : शहरामध्ये खुप मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण, संसर्ग देखील वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: ची जबाबदारी स्वत: घेवून कोरानापासून बचावासाठी प्रयत्न करावेत. लॉकडाऊन हे नेहमी नेहमी परवडणारे नाही. मागच्या वेळी ८ महिन्याच्या लॉकडाऊन मुळे समान्य नागरिक खुप मोठ्या प्रमाणात कंटाळले आहेत.
परंतू मागच्या १५ दिवसांमधील कोरोना रुग्णांचा विचार करता, शहरामध्ये सर्व नागरिकांनी आपापली काळजी घेण्याचे गरज पुन्हा निर्माण झाली आहे. तर लाॅकडाऊन मध्ये कष्टकरी, हातावर पोट असणारे व्यवसाय पुर्णपणे बंद, नुकसान देखील झाले आहे. अगोदर स्वत:चा जीव वाचवायचा आहे. आता आपल्याला कोरोना पुर्णपणे संपवण्याच्या दृष्टीने पाऊले उचलायची आहेत. घराच्या बाहेर पडताना मास्क वापरावे, हात स्वच्छ धुवावेत. गरज नसताना गर्दी करु नये, तसेच सॅनेटायझरचा वापर करुन काळजी घेण्याचे आवाहन मी आपल्या माध्यमातून करत असल्याचे त्यांनी या वेळी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितले.
आता महाराष्ट्रासह देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तर ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनी स्वत:ची काळजी घ्यायची आहे. शहरात गर्दीच्या टिकाणी एकत्र जमु नये, तर त्यामुळे या पुढे लॉकडाऊन होऊच नये, या साठी आपण प्रयत्न करायचे आहेत. तर सामान्य नागरिकांसह सर्वांनी कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. तर आणि तरच कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल. अशी प्रतिक्रिया देखील या वेळी दिली.
महत्त्वाच्या बातम्या :
- कार्यालय झाले सुंदर पण अंगणातील नाल्याचे काय?
- रामाच्या नावाने होतंय पाप ! राम मंदिर ट्रस्टने घेतला निधी संकलनाबाबत मोठा निर्णय
- ‘जोर से छाप, टीएमसी साफ’, मोदींचा बंगालमध्ये नारा
- बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचा आधार घेत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- शेतीमालाच्या रक्षणासाठी एक नवी शक्कल; शेतकरी बनला स्मार्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
