औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना एकीकडे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतानाच, दुसरीकडे मात्र, लोकप्रतिनिधी बिनदिक्कतपणे कोरोनाचे नियम मोडीत काढून जंगी वाढदिवस व इतरही विविध कार्यम पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर आदी ठिकाणी करताना दिसले. उल्लेखनीयबाब म्हणजे सदरील कार्यक्रमाची कुठलीही पोलीस परवानगी न घेता शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करून नियमांची पायमल्ली करण्यात आली.
पंढरपूरचे जिल्हा परिषद सदस्य रिपाई (ड) रमेश गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भव्य मंडप लावून शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेतला. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची परवानगी नसणाऱ्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, जि. प.चे आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे, जि. प.सदस्य सय्यद कलीम यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी सॅनिटायझर करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती.
कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षा शेळके यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधी विनामास्क उपस्थित होते. विनापरवानगी कार्यक्रम घेण्यात आला असेल तर या संदर्भात चौकशी करण्यात येईल, चौकशीत जर तसे समोर आले तर थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांच्यासह संबंधित जिल्हा परिषद सदस्य व इतरही लोकप्रतिनिधी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कार्यालय झाले सुंदर पण अंगणातील नाल्याचे काय?
- रामाच्या नावाने होतंय पाप ! राम मंदिर ट्रस्टने घेतला निधी संकलनाबाबत मोठा निर्णय
- ‘जोर से छाप, टीएमसी साफ’, मोदींचा बंगालमध्ये नारा
- बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचा आधार घेत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- शेतीमालाच्या रक्षणासाठी एक नवी शक्कल; शेतकरी बनला स्मार्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
