Share

वॉशिंग्टन सुंदरने आपल्या डॉगीला दिले ऑस्ट्रेलियाच्या स्टेडियमचे नाव ; ‘हे’ आहे कारण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टीम इंडियाचा युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने आपल्या श्वानाचे नाव ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथील क्रिकेट मैदानाच्या गाबावर ठेवले. वॉशिंग्टन सुंदर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. वॉशिंग्टन सुंदरने आपल्या कुत्र्याचे नाव गाबा असे सांगितले. वॉशिंग्टन सुंदरने आपल्या कुत्र्याचा फोटो ट्विट करुन लिहिले आहे की, ‘प्रेम हा चार पायाचा शब्द आहे. जग, गाब्बाला भेटा…’ असं कॅपशन सुदंर त्या फोटो दिलं  आहे.

यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या श्वानाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. श्वानासोबत सुदंरच्या कुटुंबाचे सदस्य देखील दिसत होते.  वॉशिंग्टन सुंदरने हा फोटो शेअर करत नेटकऱ्यांना विचारले कि, या श्वानाचे नाव काय आहे?यावर नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या होत्या. यानंतर आता सुंदरने त्याच्या श्वानाचे नाव सांगितले आहे. वॉशिंग्टन सुंदरने आपल्या श्वानाचे नाव ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथील क्रिकेट मैदानाच्या गाबावर ठेवले आहे. त्याच्या श्वानाचे नाव त्याने गाबा असे ठेवले आहे.

सुंदरने ऑस्ट्रेलियाच्या गाबा येथे कसोटी सामन्यात प्रवेश केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा शेवटचा सामना (2020-21) गाब्बा मैदानावर खेळला गेला. डेब्यू सामन्यात सुंदरने अर्धशतक झळकावून भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले होते.  त्याने शार्दुल ठाकूरसह सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. त्याचवेळी, त्याने दुसऱ्या डावात 22 धावा केल्या आणि भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!