बीड : एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत असताना डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ होत चालली आहे. शहरातील जालना रोडवरील माऊली हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर तणावाचे संतप्त नातेवाईकांनी कर्मचाऱ्यास मारहाण केली, त्यानंतर कर्मचाऱ्याने प्रतिकार करत नातेवाईकावर हात उचलला. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली. दरम्यान, तहसीलदार शिरीष वमने व शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने धाव घेतल्याने तणाव निवळला.
पोलिसांच्या माहितीनुसार, जालना रोडवरील माऊली हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपूर्वी एक वयोवृध्द रुग्ण दाखल झाला होता. या रुग्णाची प्रकृती दिवसेंदिवस नाजूक बनत गेली. अखेर रविवारी दुपारी रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी उपचारात हलगर्जी केल्याचा आरोप करत हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकास मारहाण करण्यात आली, प्रत्युत्तरात कर्मचाऱ्यांनीही नातेवाईकास मारहाण केली.
या घटनेनंतर हॉस्पिटलबाहेर रुग्णाच्या नातेवाईकांची गर्दी वाढली, त्यामुळे तणाव निर्माण झाला. अखेर शिवाजीनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक अमोल गुरले यांनी तेथे धाव घेतली, त्यानंतर तहसीलदार शिरीष वमने यांनीही हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णाचे नातेवाईक व हॉस्पिटलचे डॉक्टर, कर्मचाऱ्यांना शांत केले. त्यानंतर मृत व्यक्तीचे शव उत्तरीय तपासणीसाठी गावी पाठवून दिले. यावेळी अंत्यविधीसाठी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी पीपीई कीटसह रवाना झाले. सोबत पोलीस बंदोबस्तही पाठविण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा सरकारने मध्यम मार्ग काढला; भाजप नेत्याने केले निर्णयाचे स्वागत
- मुख्यमंत्रीसाहेब, जनतेच सोडा आधी मंत्र्यांना आवर घाला; जयंत पाटलांच्या दौऱ्यात नियमांना तिलांजली
- ‘उद्धवसाहेब तुम्ही लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्या उद्योग जगत तुमच्या पाठीशी आहे’
- लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ : अजित पवार
- पुण्यानंतर राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’ ‘हे’ असणार कडक निर्बंध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

