नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे.
या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे. तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे.
यावरून आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आज केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
‘सचिन वाझे यांना बरीच वर्षे निलंबित करण्यात आले होते, अनेक वर्षांनंतर त्यांची कोरोना काळात पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती आणि असं म्हणतात की कोरोनामध्ये मोठ्या संख्येने पोलिस आजारी पडले आहेत म्हणून त्यांना पुन्हा कामावर घेतले जात आहे. भाजपाकडून पहिला प्रश्न हा आहे की, सचिन वाझे यांना कोणाच्या दबावाखाली नेमले गेले? शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या?,’ असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे.
‘हे भ्रष्टाचाराचं प्रकरण नाही, हे तर ऑपरेशन लूट आहे. तसेच, खंडणी घेणं हा गुन्हा आहे आणि जर याप्रकरणी शरद पवार यांना माहिती दिली जात आहे तर प्रश्न हा उपस्थित होतोय की, शरद पवार तर सरकारमध्ये नाहीत, मग त्यांना कोणत्या आधारावर माहिती दिली जात आहे ? त्यामुळे सचिन वाझे राष्ट्रवादीसाठी काम करत होते की, सरकारसाठी? असा प्रश्न निर्माण होतोय,’ असा घणाघात रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना लस न घेताच मिळालं लस घेतल्याचं प्रमाणपत्र; प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड
- भाजपाच्या षडयंत्राला व गोदी मीडियाच्या दबावाला सरकारने बळी पडू नये; काँग्रेस नेत्याची टीका
- मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तिढा सुटला ! ; ‘त्या’ दोघांना ATS कडून अटक
- शिक्षकांना विमा सुरक्षा कवच देण्याची शिक्षक समितीची मागणी
- धर्मगुरूला फायटरने मारहाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

