Share

कोरोना लस न घेताच मिळालं लस घेतल्याचं प्रमाणपत्र; प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

Published On: 

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे.

कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरणावर भर दिलं जावं अशा सूचना केंद्र सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दिल्या आहेत. मात्र, आता लसीकरणामागील भोंगळ कारभार समोर येत आहे. पुणे महापालिकेच्या लसीकरण विभागातील हलगर्जीपणामुळे अनेक प्रश्न आता उभे राहिले आहेत.

शहरातील काही नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. मात्र, लस न घेताच या नागरिकांना लसीचे डोस घेतल्याचा संदेश त्यांना मोबाईलवर प्राप्त झाला. संदेशातील लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना लसीकरणाचे ‘ई-प्रमाणपत्र’ देखील मिळाले. यामुळे एकाबाजूला कोरोना वाढत असताना लसीकरणातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

लस न घेताच प्रमाणपत्र आल्याने या नागरिकांचा गोंधळ उडाला असून असा काही प्रकार घडल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत, बांधकाम व्यावसायिक भरत पुनमिया (रा. मुकुंदनगर) यांनी महापालिका आयुक्त व महापौरांकडे तक्रार करूनही दखल न घेतली गेल्याचे सांगितले आहे.

यामुळे, दिवसाला २ हजार हुन अधिक कोरोना रुग्णांची भर प्रत्येक दिवशी पडत असताना याचं गांभीर्य प्रशासनाला नसल्याचं समोर येत आहे. तर, शासन नोंदीमध्ये लसीचा पहिला डोस घघेतला गेल्याने आता त्यांना पहिला डोस उपलब्ध करून दिला जाणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!