औरंंगाबाद : माझ्या खात्यातून पैसे का काढले असे विचारणा-या धर्मगुरू जगन्नाथ पुट्टे गौडा (वय ४४, रा.शांती सदानंद अपार्टमेंनट, शांतीपुरा) यांना तीन जणांनी शिवीगाळ करून फायटरने मारहाण केली. ही घटना १८ मार्चला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी धर्मगुरू जगन्नाथ गौडा यांनी दिलेल्या तक्रारीवरून जोयेल उदय बत्तीसे, उदय चाल्र्स बत्तीसे, अलन जगन्नाथ गौडा, सर्व रा.प्लॉट नं ७, शांतीपुरा यांच्याविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या भांडणावरुन मारहाण
जुन्या भांडणातून दोघांनी चालकाला मारहाण केली. ही घटना २० मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास चेलीपुरा भागात घडली. सय्यद हिदायत सय्यद रफीक (३४, रा. काचीवाडा, चेलीपुरा) यांचा शहाबाजारातील शोहेब शफीक पठाण याच्याशी जुना वाद आहे. या वादातून शोहेब व त्याच्या साथीदाराने हिदायत यांना रस्त्यात अडवले. त्यावेळी हिदायत हे समजून सांगत असताना दोघांनी त्यांना शिवीगाळ व कड्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावरुन सिटीचौक पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपस्थित करण्यात आलेल्या शंकेची परमबीर सिंग यांनी हवाच काढली
- जोपर्यंत गृहमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भाजप आंदोलन करणार : फडणवीस
- खळबळजनक! ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून तरुणाचा खून
- काठीने मारहाण करून वृध्दाचा खून करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप!
- एमपीएससी; लातूर शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सात हजार ८९६ विद्यार्थी देणार परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

