🕒 1 min read
मुंबई : ड्रग्स प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर हे प्रकरण काही प्रमाणात शांत झाल्याचे चित्र बघायला मिळत असतांनाच एका भाजप नेते मोहित कंबोज या सगळ्या प्रकरणाचे मास्टरमाइंड सुनील पाटील असल्याचा खळबळजनक दावा केला होता. मलिकांच्या या दाव्यावर आता मोहित कंबोज यांनी पलटवार केला आहे. कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे.
आर्यन खान प्रकरणात माझ्यावर मास्टरमाइंड असल्याचा आरोप करणारे नवाब मलिक एक महिना झोपले होते का, असा पलटवार मोहित कंबोज यांनी केला आहे. मलिक यांना आताच मास्टरमाइंड वगैरे कसे सुचले, असा प्रश्न करतानाच सुनील पाटील याच्याशी बोलणे झाल्याचे रविवारी मलिक यांनी मान्य केले आहे. यापुढे आणखी अनेक गोष्टी समोर येतील. पाटील आणि मलिक यांची मैत्री आजची नसून वीस वर्षांपासूनची आहे, असा दावा कंबोज यांनी केला.
सुनील पाटीलसोबत बोलणे झाल्याचे मलिक यांनी मान्य केले आहे. पाटीलच्या आडून राष्ट्रवादी काँग्रेसनेच हे षडयंत्र रचले आहे. यात आता त्यांचे पितळ उघडे पडू लागले आहे. त्यामुळे बिथरलेले मलिक आता व्यक्तिगत आरोप करू लागले आहेत. सुनील पाटील आणि सॅम डिसूझासोबत काय संबंध आहेत, याचा खुलासा मलिक यांनी करावा, असंही कंबोज म्हणाले आहेत.
काशिफ खान याने मंत्री अस्लम शेख यांना वारंवार पार्टीला बोलावल्याचेही मलिक म्हणाले. खान आणि शेख यांच्या संबंधांचाच खुलासा त्यांनी केला आहे. ओळख नसलेला माणूस एकदा आमंत्रित करेल, ओळख असल्याशिवाय वारंवार कसे बोलावेल, एखाद्या मंत्र्यावर अनोळखी माणूस वारंवार दबाव कसा करू शकतो, असा प्रश्न करतानाच शेख आणि काशिफचे संबंध उघड झाले पाहिजेत. मंत्र्यांच्या मुलांशी त्याचे काय लागेबंध तेही उघड व्हायला हवेत, असेही कंबोज म्हणाले. मलिक यांनीच मंत्री आणि राजकारण्यांच्या मुलांबाबतची ही माहिती उघड केली, असंही कंबोज म्हणाले आहेत.
मलिक यांनी ज्या हॉटेलचे नाव घेतले त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. त्यांनी माझ्यावर अकराशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. पण, असला काही घोटाळा नाही. मी निवडणूक लढविली तेव्हा माझी ३५० कोटींची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मी एक व्यापारी आहे. दरवर्षी पाच कोटींचा कर भरतो. मुंबईत जागोजागी मलिकांची संपत्ती कशी उभी राहिली, असा प्रश्नही कंबोज यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा उद्रेक; 160 बस डेपो बंदमुळे प्रवशांचे हाल
- क्रांती रेडकर यांची बहीण ड्रग्ज व्यवसायात आहे का?; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट
- ‘कोविड-१९’मुळे देशाला व राज्याला आरोग्यमंत्री आहेत हे निदान समजले तरी- संजय राऊत
- केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे येत्या काळात स्पष्ट होणार- नाना पटोले
- ‘परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं’, नाना पटोलेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
