🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. राज्य सरकारकडून या कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांच्या 17 संघटनांची बैठक होणार आहे. तर एसटी संपाच्या प्रश्नावर उच्च न्यायालयातही सुनावणी होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील एकूण 160 बस डेपो बंद आहेत. तसेच एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
खासगी वाहतूकदारांकडून अवास्तव भाडं आकारण्यात येत असून प्रवाशांची लूट सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिकच तीव्र होत जात असल्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे राज्यभरातील 250 आगारांपैकी 160 हून अधिक आगारांतील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे दिवाळीसाठी गावी गेलेल्या प्रवाशांना या संपाचा मोठा फटका बसला आहे.
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, संपापूर्वी राज्यातील एसटी प्रवाशांची संख्या 27 लाख होती. यामध्ये घट होऊन ती 20 लाखांहून कमी झाली आहे. विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने दोन दिवस उपोषण करण्यात आले होते. मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्यात आला होता. मात्र न्यायालयाने मनाई केल्यानंतरही विलीनीकरणच्या मुद्द्यावरून अद्यापही 160 आगारांमध्ये संप सुरूच आहे
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यातून संघटनांचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. स्वारगेट डेपोमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
आज पुणे जिल्ह्यातील एकूण 13 बस डेपो बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार असून याचा एसटी महामंडळाला देखील फटका बसला आहे. सातवा वेतन लागू करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी स्वारगेट डेपोवर जोरदार घोषणाबाजी केली आहे. जिल्हा अंतर्गत प्रवासी सेवा बंद ठेवण्यात येणरा आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येणार असल्यामुळे काही प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- क्रांती रेडकर यांची बहीण ड्रग्ज व्यवसायात आहे का?; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट
- ‘कोविड-१९’मुळे देशाला व राज्याला आरोग्यमंत्री आहेत हे निदान समजले तरी- संजय राऊत
- केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे येत्या काळात स्पष्ट होणार- नाना पटोले
- ‘परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं’, नाना पटोलेंचा हल्लाबोल
- आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटींची गरज- राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
