Share

क्रांती रेडकर यांची बहीण ड्रग्ज व्यवसायात आहे का?; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप रविवारी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी केला आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मेहुणीवर हल्लाबोल केला आहे.

समीर वानखेडेंची पत्नी- अभिनेत्री क्रांती रेडकर यांची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर या ड्रग्जच्या व्यवसायात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नुकतेच समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. आज पुन्हा समीर वानखेडे यांच्यावर मलिकांनी आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे.

नवाब मलिक यांनी ट्वीट करत समीर वानखेडेंना सवाल केला आहे. ‘समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? तिची केस पुणे न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या त्याचा पुरावा’, असं म्हणत नवाब मलिकांनी काही स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केले आहेत. ‘ती महिला कोण तिच्याशी समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं’, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!