Share

‘परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं’, नाना पटोलेंचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल(७ नोव्हें.)प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला.तसेच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केल्याचा गंभीर आरोपही यावेळी पटोलेंनी केला आहे.

पटोले म्हणाले की,’केंद्रात बसलेलं भाजपाचं सरकार राज्यातील महाविकासआघाडी सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी सुरूवातीपासून प्रयत्न करत आहे. जेव्हा बिहारच्या निवडणुका आल्या तर सुशातसिंह राजपूतचा विषय काढून तेथील ठाकूर लोकांची मत मिळवण्यासाठी प्रयत्न केला. त्यामध्ये ते यशस्वी झाले. पण पुन्हा त्यांनी अनिल देशमुख, परमबीर सिंग, समीर वानखेडे प्रकरण, ड्रग्जचे मुद्दे, आर्यन खान प्रकरण पुन्हा हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करणं आणि राज्यातील सरकारला खाली पाडणं आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं ठरवून भाजपा हे काम करत आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, परमबीर सिंग यांचं शेवटचं जे लोकेशन आहे. ईडीने सांगितलं की अहमदाबादमध्ये त्यांचं शेवटचं लोकेशन मिळालं. त्यानंतर परमबीर सिंग कुठं गेले? अजुन आम्हाला दिसले नाहीत. याचाच अर्थ गुजरातमधुन परमबीर सिंग गायब झाले. त्यांना बेपत्ता करण्याचं काम केंद्रात बसलेल्या भाजपाच्या मोदी सरकारने केलेलं आहे. आमची एवढीच मागणी आहे की, ज्याने आरोप केले. आरोप करणारा माणूसच बेपत्ता आहे. तर वास्तिविकता काय हे लोकांच्या समोर आणलं पाहिजे. अनिल देशमुखच्या प्रकरणात सूड बुद्धीने हे कारवाई केलेली आहे, अशी काँग्रसेची भूमिका आहे.’

दरम्यान, देश वाचावायचा असेल, संविधान वाचावायचं असेल तर काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही मागून वार करणारे नाही. आम्ही जे आहे ते समोरून करू, लोकाशाही पद्धतीने पुढे जाऊ ही भूमिका काँग्रेसने मांडलेली आहे, असेही यावेळी पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!