Share

योद्धा पुन्हा मैदानात…राणेंची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरु होणार

Published On: 

रत्नागिरी – केंदीय मंत्री नारायण राणे यांची बहुचर्चित जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी कोकण सज्ज झाले आहे. मुख्यतः कणकवली हा राणे परिवाराचा बालेकिल्ला आहे. कणकवलीत राणेंच्या होणाऱ्या स्वागताची सर्वांना उत्सुकता आहे.

जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरभर यात्रेच्या स्वागताचे आधीच फलक लागले आहेत. रात्री राणेंना जामीन मंजूर झाल्यानंतर मध्यरात्री शहरात गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. शहरात पटवर्धन चौकात रस्त्याच्या बाजूला रात्री गुढ्या उभ्या केल्या गेल्या. मुख्य चौकात आकाश कंदील लावले गेलेत. एकंदरितच कणकवलीतील राणेंचं स्वागत जंगी होणार आणि राणेसमर्थक जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तेथील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजपाकडून देशभर जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज रत्नागिरीत पार पडणार आहे.

नारायण राणे यांच्या स्वागतासाठी लांजा शहर परिसरात सर्वच ठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण वातावरण हे भाजपामय झाले आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती आता पुन्याहा एकदा ही यात्चरा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘योद्धा पुन्हा मैदानात’ असं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!