मुंबई: कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना अगोदर शिवसेना प्रवेश तरच राज्यसभेची संधी अशी ऑफर देण्यात आली होती, मात्र संभाजीराजेंनी ही ऑफर नाकारली आहे. आता राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावरूनच भाजप तसेच संभाजी राजेंच्या समर्थकांकडून टीका केली जात आहे. त्यातच मराठा क्रांती मोर्चाने संजय राऊतांना (Sanjay Raut ) थेट इशारा दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चेचे समन्वयक अंकुश कदम यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे. छत्रपतींच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊत विरोध करत आहेत. प्रियंका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना कुठल्याही अटी-शर्थी न ठेवता राज्यसभेवर पाठवता आणि दुसरीकडे छत्रपतींच्या नावावरती एवढं वर्ष राजकारण करत आहेत, सत्ता भोगत आहेत. या शिवसेनेचा ‘शिव’च आमच्या छत्रपतींचा आहे. असे अंकुश कदम यांनी म्हटले आहे.
तसेच संजय राऊत तुमचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. २०२४ मध्ये तुम्हाला याची राजकीय किंमत मोजावी लागेल. छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढवणार. असा इशाराही अंकुश कदम यांनी दिला आहे. दरम्यान गेल्या १५ दिवसांमधील घडामोडी समजून घ्या. छत्रपतींचा, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा आम्ही संभाजीराजेंना द्यायला तयार झालो. यापेक्षा शिवसेना अजून काय करू शकते हे सांगावं. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- रिलीजपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाहणार ‘पृथ्वीराज’ चित्रपट
- “मोदींच्या नावावर ज्यांनी मत घेतली त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी…” – किरीट सोमय्या
- IPL 2022 GT vs RR : पहिल्याच प्रयत्नात फायनल..! गुजरातचा कॅप्टन पंड्या म्हणतो, “मी कितीही चांगला…”
- “बारामतीचा गडी एवढा हुशार कसा, ब्रह्मदेवाला..”, सदाभाऊंचा शरद पवारांना टोला
- शिवसेनेने संजय पवारांना उमेदवारी दिल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया! म्हणाले, “संभाजीराजेंची कोंडी…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

