सांगली : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ‘बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे,’ असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदारनिधीतून आटपाडी तालुक्यात एका कार्यक्रम प्रसंगी सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांनतर पवारांनी ट्वीट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नका, असे म्हटले. पण आम्ही असं म्हटलंच नाही, हे ब्राह्मण समाज आता ओरडून सांगत आहे. त्यामुळे बारामतीचा गडी कसा आला, हे आपण वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे. मला वाटतं की, हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल. इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीच मिळणार नाही. असा खोचक टोला सदाभाऊ यांनी लगावला आहे.
तसेच मी पुन्हा येईन, हे वाक्य आपल्याला खरं करायचं असून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे. असा दावाही सदाभाऊ यांनी केला आहे. दरम्यान सदाभाऊ यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “देशाचे नेते खासदार शरद पवार हुशार आहेत हे मान्य केल्याबद्दल सदाभाऊ खोत यांचे मनापासून आभार. मात्र पवार साहेब हे कुठल्या स्पेअर पार्ट ने बनले आहेत हे आपल्याला या जन्मात कधीही कळू शकणार नाही, कारण तुमची नजर फक्त द्वेषाचीच आहे.”, असा टोला महेश तपासे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…तर सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला असता” ; उजनीच्या पाण्यावर विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया
- ओबीसींचे आरक्षण गेले नाही तर आरक्षण अजूनही ऑक्सिजनवर आहे – हरिभाऊ राठोड
- “… यापेक्षा शिवसेना अजून काय करू शकते हे सांगावं”, संभाजीराजेंच्या उमेदवारीवरील टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
- C Reservation : “विधानसभा निवडणूक जिंकायची या कपट हेतुने…”, अमोल मिटकरींचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप
- “पवार साहेब या जन्मातच काय तर…”, महेश तपासे यांचा सदाभाऊंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

