Share

रिलीजपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाहणार ‘पृथ्वीराज’ चित्रपट

Published On: 

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याचा आगामी ‘पृथ्वीराज’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. माहितीनुसार, हा चित्रपट पुढच्या महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. नुकतीच या चित्रपटाबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’ पाहणार आहेत. केंद्रीय मंत्री १ जून रोजी हा चित्रपट पाहतील, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी मंगळवारी दिली.

चंद्रप्रकाश यांनी सांगितले कि, “गृहमंत्री हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन दिवस आधी पाहतील. देशासाठी बलिदान देणारे भारतमातेचे शूर सुपुत्र पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे साक्षीदार गृहमंत्री अमित शाह होणार आहेत, ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे”.

या चित्रपटामध्ये बॉलिवूड स्टार ‘अक्षय कुमार’ सम्राट पृथ्वीराजच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मानुषी छिल्लर ही देखील संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय संजय दत्त, सोनू सूद, साक्षी तन्वर हे  कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट ३ जूनला हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या  :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!