मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सध्या मोठे राजकीय डावपेच घडून येत आहेत. आता मात्र राज्यसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवारीवरून सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांचे नाव शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. ही घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल (मंगळवार) केली आहे. दरम्यान, यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आधी शरद पवार यांनी हा सगळा विषय सुरू केला. त्यानंतर ज्या दिशेने तो विषय गेला, ते सगळं वेगळंच काहीतरी झालं आहे. कदाचित संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी करण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. पण तो त्या-त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी बोलण्याचं कारण नाही.”
शिवसेना अजून काय करू शकते-
कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना अगोदर शिवसेना प्रवेश तरच राज्यसभेची संधी अशी ऑफर देण्यात आली होती, मात्र संभाजीराजेंनी ही ऑफर नाकारली आहे. आता राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावरूनच भाजप तसेच संभाजी राजेंच्या समर्थकांकडून टीका केली जात आहे. याला संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
या सर्वांशी संजय राऊतांचा वैयक्तिक काय संबंध आहे? गेल्या १५ दिवसांमधील घडामोडी समजून घ्या. छत्रपतींचा, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा आम्ही संभाजीराजेंना द्यायला तयार झालो. यापेक्षा शिवसेना अजून काय करू शकते हे सांगावं, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“तसेच आमची भूमिका हीच होती की ही जागा शिवसेनेची आहे. आपण शिवसेनेचे उमेदवार व्हा. त्यामुळे छत्रपती किंवा त्यांच्या कुटुंबाला राजकीय पक्षाचे वावडं असण्याचं कारण नाही. मालोजीराजे भोसले यांनी देखील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आहे. ते राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यामुळे छत्रपतींच्या घराण्यातले राजकीय पक्षात जात नाही हा त्यांच्या समर्थकांचा दावा अयोग्य आहे”, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

