सांगली : सांगली येथील आयर्विन पुलाचा पातळी आज दुपारी 2 वा. 39 फुट असून ती ओसरत आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा व संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करुन धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीव विसर्गामुळे कृष्णा नदीच्या सध्याच्या पाणी पातळीत 1 ते 2 फुटांची वाढ होऊ शकते. त्यामुळे आर्यर्विन पुल सांगली येथील पाणी पातळी 40 ते 42 फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावातील ग्रामस्थ/शेतकरी यांनी सतर्क रहावे
सध्यस्थितीत कोयना धरण 86 टक्के भरले असून 48 हजार 931 क्युसेस विसर्ग होत आहे. धोम धरण 79 टक्के भरले असून 3 हजार 594 क्युसेस विसर्ग सुरु आहे. कण्हेर धरण 79 टक्के भरले असून 4 हजार 94 क्युसेस विसर्ग सुरु आहे. उरमोडी धरण 75 टक्के भरले असून 2 हजार 919 क्युसेस विसर्ग सुरु आहे.
त्यामुळे सध्याच्या पाणी पातळीत त्यामुळे आर्यर्विन पुल सांगली येथील पाणी पातळी 40 ते 42 फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावातील ग्रामस्थ/शेतकरी यांनी सतर्क रहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 0233-2301820, 2309525 या संपर्क साधावा.
महत्त्वाच्या बातम्या
- डॉमीनोझ नंतर आता ‘या’ कंपनीने केली पदक विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

