दिल्ली : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबाद संघाला ७ गडी राखुन पराभुत केले. हैदराबादने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य चेन्नईने केवळ ३ गडी गमावक एकोणीसाव्या षटकात पुर्ण केले. चेन्नई सुपर किंग्सचा हा स्पर्धेतील सलग पाचवा विजय आहे. धडाकेबाज अर्धशतक करणाऱ्या ऋुतूराज गायकवाडला(७५) सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक झळकावत कॅप्टन इनिंग्स खेळला. या खेळीदरम्यान वॉर्नरने त्याच्या एका बुटावर पत्निचे आणि तिन्ही मुलींची नावे लिहीली. त्याच्या पांढऱ्या रंगांच्या बुटावर मागील बाजूला आयवी, इंडी आणि इस्ला असे लिहिलेले होते. तर, त्याच्या बुटावरील एका बाजूला पत्नी कँडिसचेही नाव लिहिलेले होते.
If u can see those 3 angels of Dave Warner rt it???? pic.twitter.com/sMIzKpIw8I
— Alone Walker (@aawara_engynar) April 28, 2021
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर हा त्याच्या कुटुंबीयांना सोडून आयपीएल २०२१ साठी भारतात आला आहे. ३४ वर्षीय वॉर्नरने २०१५ साली कँडिस वॉर्नरसोबत लग्नगाठ बांधली. त्याला आयवी मे , इंडी रे आणि इस्ला रोज या नावाच्या तीन मुली आहेत. सामन्यात वॉर्नरने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कॅमेरामनने त्याच्या बुटावर कॅमेरा फोकस केला आणि दर्शकांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. यानंतर सोशल मीडियावर त्याच्या या कृतीची भन्नाट चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारने आता तरी राजकीय ईर्षा सोडावी : सामना
- देशमुखांच्या अडचणीत वाढ, सीबीआय करणार रश्मी शुक्लांना साक्षीदार
- ‘क्वारंटाईन सेंटरला चला’ म्हणताच… ४३ बाधितांनी केला पोबारा!
- ऑरेंज कॅपच्या शर्यतीत डूप्लेसिस पोहोचला अव्वस्थानी; शिखर धवनला टाकले मागे
- ‘कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसीची किंमत १५० रुपये निश्चित करा’


