जालना: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतोय, वाढत्या संसर्गामुळे रुग्णसंख्या वाढत आहे, पण त्याच बरोबर नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण सुद्धा तयार होत आहे. भोकरदन तालुक्यातील टाकळी भोकरदन येथे मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ४३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे या बाधितांना आरोग्य विभागाच्या वतीने कोविड सेंटर येथे हलविण्याच्या हालचाली सुरू असताना अचानक सर्व बाधित गावातून फरार झाल्याने एकच खळबळ उडाली.
कार्यालयात १३१ ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला. त्यात तब्बल ४३ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधितांना तातडीने कोविड सेंटर येथे उपचारासाठी हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या. मात्र, बाधित रुग्णांनी कोविड सेंटरला जाण्यास नकार देत सहकार्य करीत नसल्याने अखेर आरोग्य विभागाने भोकरदन पोलिसांना पाचारण केले. पोलिसांचे वाहन गावात दाखल होताच बाधित रुग्णांनी गावातून पळ काढला. त्यामुळे एकही रुग्ण घरी न सापडल्याने पोलीस व आरोग्य विभागाचे पथक रिकाम्या हाताने परतले.
एकंदर प्रकाराने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान गावात डॉ. अहमद यांच्यासह पथक तळ ठोकून आहेत. एकाच दिवशी तब्बल ४३ कोरोना रुग्ण आढळून आल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रघुवीर चंदेल, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश बावस्कर, वैद्यकीय अधिकारी सिद्दीकी, एस.एम.पांढरे, के. एम. शिंदे, जी. एम. देशपांडे, आर. आर. राकडे, एन. पी. पोटे, मनीषा पालकर , तलाठी पी . बी . समीनद्रे, ग्रामसेवक पी. आर. गायकवाड, शिक्षक के. आर. जंजाळ आदी गावात ठाण मांडून होते.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी सरकारची निमयावली जारी
- चेन्नई एक्सप्रेस सुसाट; हैदराबाद संघावर ७ गडी राखुन मात
- ऑक्सिजन अभावी दौंडमध्ये ४ रुणांचा मृत्यू, नातेवाईकांचा हॉस्पिटलवर आरोप
- अखेर दीपाली चव्हाण प्रकरणी निलंबित वनसंरक्षक एम एस रेड्डीला अटक
- ‘दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलू नका’ पंकजांनी ठाकरे सरकारला सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

