Share

‘वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री’; भाजपचं टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टाळ मृदुंगात ग्यानबा तुकारामचा गजर करत व रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या शिवशाही बस १० मानाच्या पालख्या घेवून निघाल्या आहेत. तर आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काही वेळापूर्वीच वखारी येथे पोहचली आहे. संत मुक्ताई पालखी, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यानं पहाटेचं पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे.

दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा करण्यात येत असती. पूजा करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह सोमवारीच पंढरपूरला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे ते स्वत: गाडी चालवित पंढरपुराकडे मार्गक्रमण करत आहेत. मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व जनतेचे प्रतिनिधी म्हणून जरी उद्या शासकीय पूजा करणार असले तरी लाखो वारकऱ्यांची वारी यंदा देखील चुकल्याने भाजपने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी चारोळी लिहीत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावलाय.

‘जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम! पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम! एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम! तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला… वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…’ असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!