Share

डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यापूर्वी कोहली-रहाणे यांच्यात रंगले ‘युद्ध’

Published On: 

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने शुक्रवारीपासून साऊथॅम्प्टनमध्ये सराव सुरु केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे होईल. टायटल सामन्याआधी टीम इंडियाने स्वत: ची तयारी करण्यासाठी इंट्रा-स्क्वॉड (त्यांच्याच खेळाडूंमधील) सामने खेळले. हा सामना 4 दिवसांचा आहे.

एका संघाची कमान विराट कोहलीकडे सोपविण्यात आली आहे, तर दुसर्‍या संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहेत. टीम इंडियाच्या या सराव सामन्याची काही फोटो समोर आली आहेत. या फोटोमध्ये विराट कोहली आणि शुभमन गिल एकत्र फलंदाजी करताना दिसत आहेत.

अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा संघात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात आहे. याशिवाय रहाणेच्या संघात मोहम्मद शमीही आहे. त्याचबरोबर शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा या खेळाडूंचा विराटच्या संघात समावेश आहे.

टीम इंडिया कोणत्याही सामन्याचा सराव न करता अंतिम फेरीत प्रवेश करेल. भारतीय खेळाडू प्रथम मुंबईतील एका हॉटेलमध्ये विलीकरणात होते आणि नंतर इंग्लंडमध्ये आल्यानंतरही टीम इंडिया विलगीकरणात होती. विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर टीम इंडियाने मैदानावर सराव करण्यास सुरवात केली.

बीसीसीआयने नेट सत्रादरम्यान खेळाडूंचा आणखी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये कर्णधार कोहली, चेतेश्वर पुजारा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि रिषभ पंत सराव करताना दिसले. यापूर्वी विराट कोहली नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला.  भारतीय फलंदाजांनी नेटमध्ये बॉल टाकण्याचा सराव केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!