मुंबई : सुप्रसिद्ध मराठी गायीका सावनी रवींद्र हिच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. इन्स्टाग्राम या सोशल अंकाउटवर सावनीने ही गोड बातमी शेअर केली होती.त्यानंतर आता तिने बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सावनीने तिचा पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहे. सावनीच्या घरी नवीन सदस्य लवकरच येणार आहे. नुकताच पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून तिला पुरस्कार मिळाला होता. सावनी रवींद्र हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बेबी शॉवरचे फोटो शेअर करत म्हटले की, माझ्या प्रिय मैत्रिणींनो तुम्ही मला स्पेशल वाटण्यासाठी जे केले त्यासाठी मी तुमचे आभारी आहे. लव यू… अद्भूत लोकांसोबत अप्रतिम वेळ व्यतित केला.
https://www.instagram.com/p/CP948UkDGO3/?utm_source=ig_web_copy_link
सावनीने तिच्या सुरेल आवाजात अनेक गाणी गायली आहेत. तिचे गाण्यामुळे तिने अनेकांच्या मनात स्वत:च स्थान निर्माण केले आहे. यातच तिने दिलेल्या या गोड बातमीमुळे तिला सोशल मिडीयावर चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेने केले चॉकलेटचे वाटप!
- ‘एकदा या स्मार्ट शहराची यातना बघा ओ’, औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या पोस्टवर नागरिकांच्या भन्नाट प्रतिक्रिया!
- ‘प्रकाश आंबेडकरांना नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीत राहण्याची घाण सवय’, काँग्रेस पदाधिकाऱ्याचा हल्लाबोल
- ‘चंद्रकांत पाटील किंवा भाजपमधील अन्य कोणालाही उत्तर देणे मी रास्त समजत नाही’
- येणाऱ्या काळात खाम नदीकाठ पिकनिक स्पॉट म्हणून नावारूपास येईल- पालकमंत्री देसाई


