मुंबई : भारतीय संघ नुकताच इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. सध्या भारतीय संघ हा विलगीकरणात असुन न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयारी करत आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुचा दुसरा संघ हा पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.
मर्यादित षटकांची ही मालिका १३ जुलैपासुन सुरु होउन २५ जुलै पर्यंत चालणार आहे. यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १३ जुलै, दुसरा १६ आणि तिसरा सामना १८ जुलै रोजी होणार आहे. तर टी-२० मालिकेतील पहिला सामना २१ जुलै, दुसरा २३ जुलै आणि अंतिम सामना २५ जुलै रोजी खेळवीण्यात येणार आहे.
बीसीसीआयने श्रीलंका दौर्यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. यात काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे आहेत. या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती देण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी भारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे. 6 नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र चंगली कामगिरी करूनही काही खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळलेली नाही त्यामुळे या खेळाडूंनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
यातच मनदीप सिंग देखील नाराज झाला आहे. मनदीप आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळतो. मनदीपला श्रीलंका दौऱ्यासाठी आपल्याला संधी मिळेल, असं मनदीपला वाटलं होतं, पण टीममध्ये निवड न झाल्यामुळे तो निराश झाला आहे. मनदीपने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला. कोणालाच परवा नाही, फक्त जास्तीत जास्त मेहनत करा, असं कॅप्शन देखील त्याने दिल आहे.

मनदीप सिंगने 2016 साली टीम इंडियात पदार्पण केलं होतं. धोनी कर्णधार असताना तो 3 टी-20 मॅचही खेळला होता, यात त्याने एक अर्धशतकही केलं. 43.50 च्या सरासरीने मनदीपने 87 रन केले होते, पण यानंतर त्याला टीममधून बाहेर करण्यात आलं आणि मग त्याचं अजूनपर्यंत पुनरागमन झालं नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेने केले चॉकलेटचे वाटप!
- ‘एकदा या स्मार्ट शहराची यातना बघा ओ’, औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या पोस्टवर नागरिकांच्या भन्नाट प्रतिक्रिया!
- ‘प्रकाश आंबेडकरांना नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीत राहण्याची घाण सवय’, काँग्रेस पदाधिकाऱ्याचा हल्लाबोल
- ‘चंद्रकांत पाटील किंवा भाजपमधील अन्य कोणालाही उत्तर देणे मी रास्त समजत नाही’
- येणाऱ्या काळात खाम नदीकाठ पिकनिक स्पॉट म्हणून नावारूपास येईल- पालकमंत्री देसाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

